मनाचं असं एक वेगळंच मन असतं आशेच्या एका किरणाचं पण सूर्याइतकं तेज असतं वास्तविकतेनं मात्र याला खूप वेळा दुखावलं आठवणींच्या बोचऱ्या काट्यांमध्ये याला परत कसं फुलवावं? खूप त्रास झाला, खूप कष्ट पडले प्रयत्न करून मनास मी कसेतरी बांधले... "जे झाले ते चांगल्यासाठीच झाले..." अशी सारखी त्याची समजूत घालत राहिले... आणि मग त्या दिवशी... परत ते भेटणं, पूर्वीसारखं बोलणं... मनाच्या जखमेवर, हळूवार फुंकर घालत राहणं... शेवटी निघताना... मनाला घातलेला बांध तुटू पाहत होता... निराशेच्या गर्तेत पण आशेचा आधार वाटत होता... बुद्धीच्या तर्काविरुद्ध मनाने शेवटी बंड केलेच शहाणपण बाजूला सारून वेडेपण जवळ केले... भावनांच्या भरतीला तरी मी किती वेळ थोपवून ठेवू? बोलायचं होतं बरंच काही... पण ओठी आले फक्त - "येऊ?" तो एकच शब्द, आशेने किती ओतप्रोत भरलेला तू "थांब!" म्हणशील, हे ऐकण्यासाठी जीव आतुरलेला काही क्षण असेच गेले, स्तब्ध, सुन्न शांततेत... मनाच्या जखमेवर जणू, कुणी ओढले होते वेत... शेवटी मीच परत मनाचे पंख छाटले दटावत त्याला परत जमिनीवर आणले त्याला जे पाहिजे होते ते कधी मिळणार नव्हते असं ...