Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

चुकलेली दृष्टी आणि झालेला दगड

ज्या गोष्टी आपल्या एकदम जवळ असतात त्या बहुतेक वेळा आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. डोळ्यांच्या अगदीच जवळ असल्यामुळे त्यातले बारकावे दृष्टीआड होतात. आपल्याला नेहमीच असं वाटत राहतं की त्या गोष्टीत काहीच दोष नाहीत. माणसांचंही थोडं असंच असतं. वर्षानुवर्ष आपल्याबरोबर असणाऱ्या माणसांचं आपल्याला सगळंच बरोबर वाटतं. त्यांचे अवगुण, त्यांच्या उणिवा या नजरेआड गेलेल्या असतात, किंवा त्या अश्या कधी स्पष्ट दिसतच नाहीत. यातली काही माणसं आपली एकदम 'खास' असतात. ही अशी लोकं असतात ज्यांबद्दल आपल्याला असा दृढ विश्वास असतो की ते 'आपल्याला' चांगलं जाणतात. आपला स्वभाव, आपले विचार, आपले गुण-दुर्गुण, त्यांना सगळं माहिती असतं असं आपल्याला वाटत असतं. आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास करतो आणि आपण असं समजतो की ती व्यक्ती नेहमी 'आपल्याला' काय वाटतं याचा विचार करेल. कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय 'आपली' बाजू समजून घेईल आणि जर आपलं कुठं चुकत असेल तर नीट समजावूनही सांगेल. हे असं सगळं आयुष्य चांगलं चाललेलं असतं, त्यांचं पण आणि आपलं पण. पण कधीकधी प्रसंगच असे उद्भवतात की डोळ्यांच्या अगदीच जवळ