Skip to main content

चुकलेली दृष्टी आणि झालेला दगड

ज्या गोष्टी आपल्या एकदम जवळ असतात त्या बहुतेक वेळा आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. डोळ्यांच्या अगदीच जवळ असल्यामुळे त्यातले बारकावे दृष्टीआड होतात. आपल्याला नेहमीच असं वाटत राहतं की त्या गोष्टीत काहीच दोष नाहीत.

माणसांचंही थोडं असंच असतं. वर्षानुवर्ष आपल्याबरोबर असणाऱ्या माणसांचं आपल्याला सगळंच बरोबर वाटतं. त्यांचे अवगुण, त्यांच्या उणिवा या नजरेआड गेलेल्या असतात, किंवा त्या अश्या कधी स्पष्ट दिसतच नाहीत. यातली काही माणसं आपली एकदम 'खास' असतात. ही अशी लोकं असतात ज्यांबद्दल आपल्याला असा दृढ विश्वास असतो की ते 'आपल्याला' चांगलं जाणतात. आपला स्वभाव, आपले विचार, आपले गुण-दुर्गुण, त्यांना सगळं माहिती असतं असं आपल्याला वाटत असतं. आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास करतो आणि आपण असं समजतो की ती व्यक्ती नेहमी 'आपल्याला' काय वाटतं याचा विचार करेल. कुठल्याही पूर्वग्रहाशिवाय 'आपली' बाजू समजून घेईल आणि जर आपलं कुठं चुकत असेल तर नीट समजावूनही सांगेल.

हे असं सगळं आयुष्य चांगलं चाललेलं असतं, त्यांचं पण आणि आपलं पण. पण कधीकधी प्रसंगच असे उद्भवतात की डोळ्यांच्या अगदीच जवळ असलेली ती गोष्ट आणि आपल्या अगदीच जवळ असणारी ती माणसं दोन्हीही दुरावतात. यात त्या प्रसंगाचा दोष नसतो, असतो तो त्या आंधळेपणाचा जो ती गोष्ट आणि लोकं जवळ असल्यामुळे आलेला असतो. माणसं हळूहळू दूर जायला लागतात तसं तसं आपल्याला आणखी स्पष्ट दिसायला लागतं. आपल्याला कळायला लागतं की आपण जसं समजत होतो तसं कधी नव्हतंच. आपण 'आपली' म्हणणारी ती माणसं कधी 'आपल्याला' समजू शकलीच नाहीत. ज्यांच्यावरती आपल्याला विश्वास होता की ही लोकं आपल्याला समजून जर आपलं चुकत असेल तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतील, ती लोकं मात्र दुसऱ्यांचा विचार करून आपलीच दिशाभूल करताएत. बाकीचे लोकं काय म्हणतील या चुलीत 'आपल्याच' भावनांचं स्वहस्ते सरपण घालताएत.

दुःख होतं, खूप दुःख होतं जेव्हा या सगळ्याची जाणीव होते. वाटतं दूर जावं सगळ्यांपासून. माणसं हवीतच कशाला आपल्याला? पण या सगळ्यासाठी पण आता बराच उशीर झालेला असतो. कितीही नाही म्हणलं तरी या माणसांबरोबर आपण जोडले गेलेलं असतो. या सगळ्या कुचंबणेत शेवटी आपणंच मरतो. आपल्याच मनाचा एक सुंदर कोपरा बेचीराख होतो. विश्वासाला गेलेला तो तडा कधीही न भरून येणारा असतो. क्रोधाची ती धगधगती ज्वाळा ही काही काळाने शांत होते. आणि मग मागे राहतो तो केवळ एक भावनाशून्य दगड. परत कधीही न जळणारा, न पाझरणारा

Comments

Popular posts from this blog

Ramayana

When I was studying engineering, we learnt in one of the subjects that a less probable event conveys more information. 'The sun rises in the east' - hmm... ok... everyone knows this... so what? See what I mean, zero information. But when you read 'Click here to know xyz about Nick Priyanka's wedding', now that's information(according to news outlets) since the probability of a common person knowing that xyz is miniscule. [Disclaimer: The subject only dealt with quantity of information. It didn't have any theory on the quality of information.(Although I wish it did, so that I could use it to purge my news feed)]. Anyways, I am writing about probability of events because often in our lives, rare events or one-off moments are the ones which make the most impact. An unplanned trip to Lonavala will be the one of your best outings(despite a lack of candid pics which you pose for). An unexpected act of kindness remains etched in your conscience changing your o...

The Reason I Travel

Recently one of my friends posted a question on FB as to why do you travel? He got many responses to the question including mine. Many of the responses had the common thread of exploration, perspective, life is short etc. Even when I was writing my response I wanted it to be brief, but ended up writing quite a few lines. Many days have passed since, and I have visited some more new places and gained new experiences. But it is not always about the pleasant experiences and beautiful locations. Sometimes you are stranded at a bus stop and meet some unpleasant people or have the beautiful image of the place that you have in your mind, destroyed by the ground realities. It is at these times I think to myself, why do I do this? I know this sounds corny, but such questions inevitably occur when you are waiting for the train for 10 hours. (I reached 6 hours early and the universe rewarded my overzealous punctuality by delaying the train by 4 hours. I finished a novel in that time, cleared the...

A Copernicus I Met

When I first came to know that the catholic church had banned Copernicus' book because in it he suggested that the earth revolves around the sun, I thought 'What!, its so obvious'. Maybe it was because I already 'knew' that the earth is not the centre of our solar system. But now I can understand why the church did what it did. When we hear something getting repeated or experience something everyday, we tend to think that this is how things are. And when we encounter something out of the ordinary it comes as a rude shock. We have been wired to think about ourselves a lot, it's how we have survived as a species. Of course we think about our families, our friends, relatives and the society(this one is unnecessary most of the times). But we think about all of them from 'our' perspective. For people living in cities, this becomes a more acute problem because we have a very strict routine and few (meaningful) human contacts. So we are always concerned with...